अहेरी:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.
सकाळी पंचशील ध्वज ज्येष्ठ महिला सुगंदाबाई ओंडरे यांच्या शुभहस्ते फडकविण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी बौद्ध मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायणजी अलोणे हे होते तर विचारपीठावर उदघाटिका सुगंदाबाई ओंडरे, ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सचिव सुरेंद्र अलोणे, सामाजिक कार्यकर्ते रियाज भाई शेख, श्रीकांतजी मद्दीवार, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी रियाज भाई शेख, सुरेंद्र अलोणे, प्रशांत भिमटे , तानिया अलोणे आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकले.तर महिलांनी सामूहिक रित्या उत्कृष्ट भिमगीत गायन केले.
सायंकाळी अहेरी शहरातून भव्य भीम रॅली काढण्यात आली.यात सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम , अहेरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, सोहिल वाळके, रियाज शेख, नागेश मडावी, ताजू कुळमेथे, कपिल ढोलगे, राहुल गर्गम, संदीप ढोलगे, परशुराम दहागावकर, श्याम ओंडरे, प्रमोद भिमटे, महेंद्र मेश्राम, रामचंद्र ढोलगे, शिवाजी ढोलगे, देवाजी अलोणे, राजानंद दहागावकर, धनराज गोमासे आदी आणि बहूसंख्येने समाज बांधव भीम रॅलीत सामील होते.

