अहेरी : भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य शाखेच्या नियोजनानुसार ” राज्यस्तरीय बोधिसत्व धम्मज्ञान परीक्षा 2025 “ ही परीक्षा महामानव बोधिसत्व ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना अभिवादन करण्यासाठी दिनांक 13 एप्रिल 2025 ला परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
या विशेष परीक्षेत गट क्रमांक 1 मधून प्रतीक्षा कांबळे, पावनी सुनतकर, आयुषी कांबळे, आरुषी रामटेके ह्या विध्यार्थिनीने राज्यातून तिसऱ्या क्रमांकाच्या गुणवत्ता यादीत झळकल्या. 50 पैकी 47 गुण मिळाले आहेत. ह्या तीनही विद्यार्थिनी तक्षशीला धम्मशिक्षण संस्था चेरपल्ली ता. अहेरी ह्या संस्कार वर्गातील नियमित विद्यार्थिनी आहेत. त्यांना संस्कार वर्गाच्या मार्गदर्शक म्हणून समाजसेविका कांता कांबळे यांनी तथागत भगवान बुद्ध यांचे तत्वज्ञान आणि महामानव बोधिसत्व ड्रॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य विषयक ग्रंथ साहित्याचा अभ्यास सराव करीत असतात. ही परीक्षा दक्षिण गडचिरोली च्या पाच तालुक्यात पाच केंद्रावर घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष दामोधर राऊत, सचिव आनंद अलोणे, संघटक भीमराव झाडें आलापल्ली, प्रा. प्रकाश मेश्राम मुलचेरा, प्रा. रतन दुर्गे अहेरी , प्रा. एम. एल. डोंगरे सिरोंचा, ह्यांच्या नियोजनबद्ध सहकार्याने परीक्षा घेण्यात आली. उत्तीर्ण सर्व परीक्षार्थ्यांना राज्यस्तरीय प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे.

