आलापल्ली : दिवंगत डॉ किशोर नैताम फाऊंडेशन आलापल्ली तर्फे 6 ते 15 वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन दिनांक 10 मे ते 25 मे पर्यंत डॉ सुमती नैताम (अध्यक्षा) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते .शिबीरात मुलांच्या
व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेले विविध उपक्रम राबविण्यात आले.सदर शिबिर हे अहेरी तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिर मुलाच्या वर्गाबाहेरील वाढीवर आणि विकासावर सकारात्मक परिणाम करणारे ठरले. शिबिरामध्ये मुलांना आत्मविश्वास, स्वातंत्र्य, सामाजिक कौशल्ये आणि नवीन कौशल्ये शिकण्याची संधी देण्यात आली. तसेच, मुलांना नवीन मित्र बनवण्याची आणि टीमवर्क शिकण्याची संधी उपलब्ध झाली.
उन्हाळी शिबिरात मुलांना त्यांच्या आवडीचे काम निवडण्याची आणि ते पूर्ण करण्याची संधी मिळाली यामुळे त्याच्यात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला.
आज दिनांक 25 मे ला सदर शिबिराचा समारोप करण्यात आला याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर मेश्राम सरपंच आलापल्ली व प्रमुख पाहुणे म्हणून रावजी नैताम, डॉ समता मडावी, पुष्पा अलोने, बबलु सडमेक, सौ. शैलजा गोरेकर , खुर्शीद शेख, कैलाश कोरेत आणि फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुमती नैताम यांनी केले . सदर उन्हाळी शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांसाठी महा अंनिस शाखा आलापल्ली तर्फे स्वंय अध्ययन परिक्षा मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी घेण्यात आली त्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु वैष्णवी कोरेत आणि व ओम कांबळे यांनी तर आभार श्री खुर्शीद शेख यांनी मानले.

