प्रतिनिधी
अहेरी : निवडणूक सहज सोपी व्हावी म्हणून पतसंस्थेच्या निवडणुकीत विविध उमेदवार एकत्रित येऊन पॅनल तयार करीत असतात. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीया निवडणुकीत समता व सोसायटी बचाओ पॅनल असे दोन पॅनल तयार झाले आहे. या दोन पॅनलच्या उमेदवारा व्यतिरिक्त दिवाकर वाघमारे एकट्याने निवडणूक लढवीत आहेत. पतसंस्थेच्या निवडणुकीत दिवाकर वाघमारे यांची भूमिका ‘वन मॅन आर्मी’ अशी आहे.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणूक इतर मागास वर्ग असा गट आहे. या गटात समता समता पॅनल कडून अविनाश कविराजवार हे निवडणूक लढवीत आहेत. तर सोसायटी बचाओ पॅनल ने विद्यमान संचालक टार्जन बळवंत सुरजागडे यांना उमेदवारी दिली आहे.
या गटातून तिसरे उमेदवार म्हणून दिवाकर वाघमारे आहेत. निवडणुकीच्या मैदानात वेगवेगळ्या गटातून दोन्ही पॅनल कडून 13 आणि 13 असे एकूण 26 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या व्यतिरिक्त एकमेव उमेदवार म्हणून दिवाकर वाघमारे यांची ओळख निर्माण झाली आहे.
दिवाकर वाघमारे सिंगनपेठ येथे प्राथमिक शिक्षक असून बऱ्यापैकी परिचित उमेदवार आहेत. शिक्षक संघटनेमध्ये त्यांचा व्याप मोठा नसतो स्थानिक पातळीवर यांची ओळख आहे. याचा फायदा होऊ शकतो हे लक्षात घेऊन ते निवडणुकीच्या मैदानात असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित सगळे उमेदवार पॅनल मध्ये बांधल्या गेले असल्याने त्यांचा सामूहिक प्रचार सुरू आहे. दुसरीकडे दिवाकर वाघमारे एकट्याने ‘खिंड’ लढवित आहेत. दिवाकर वाघमारे यांचे पॅनल नसले तरी मित्रमंडळींचे सहकार्य घेऊन प्रचारावर भर देणार असल्याचे सांगण्यात येते.
निवडणुकीचा प्रचार सहज सोपा व्हावा म्हणून दिवाकर वाघमारे यांनी सुद्धा ‘पतंग’सारखे हलके-फुलके चिन्ह निवडले. कुठे हाताळण्याजोगे ही चिन्ह आहे. या हलक्या-फुलक्या चिन्हाला मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी ते मतदारांची साथ घेणार आहे.

