रेगुंठ्याच्या किरण कुर्माला मुक्ता सन्मान पुरस्कार
सिरोंचा : शिक्षण घेत असताना कुटुंबाला हातभार लावण्यासाठी परसेवाडा डोंगरातून चारचाकी प्रवासी वाहन चालवणारी किरण कुर्मा प्रसिद्धीच्या झोतात आली. काही सामाजिक संघटनेने दखल घेतली. तिला पुढील शिक्षणासाठी लंडन येथे पाठविले. तिने आपल्या यशाचा झेंडा कार्पोरेट क्षेत्र रोवला. तिच्या योगदानाची दखल एका खाजगी दुरचित्रवाणीने दखल घेतली. मुक्ता सन्मान पुरस्कार देऊन तिचा गौरव करण्यात आला आहे.
किरण कुर्मा हिचा प्रवास युवकांसाठी प्रेरणादायी आहे.सिरोंचा तालुक्याच्या दुर्गम भागात वास्तव्य करणारी युवती परिस्थिती सोबत संघर्ष करून जगत होती. सोबतच शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न पाहत होती. तिच्या पंखाला बळ मिळाले. लंडन पर्यंत पोहोचली. गडचिरोली जिल्ह्याच्या युवकांसाठी ती आयकॉन ठरली आहे.
मुंबई येथे झालेल्या एका समारंभात तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे श्रेय शिक्षक व मातापित्यांना दिले. पुरस्काराबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.
