संतोष चिकाटे
आलापल्ली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आलापल्ली शाखा अध्यक्ष संतोष चिकाटे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती इस्लामपूर जि. सांगली कडून ‘शतकवीर कार्यकर्ता 2025’ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती पत्रिकेच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल संतोष चिकाटे यांना ‘शतकवीर कार्यकर्ता 2025’ चा हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
शहादा जि. नंदुरबार येथे विस्तारित राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत 30 मे 2025 ला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून उत्तम जोगदंड, डॉ. नितीन शिंदे, माधव बावगे, अविनाश पाटील इत्यादींची उपस्थिती राहणार आहे.
‘शतकवीर कार्यकर्ता 2025’ चा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संतोष चिकाटे यांचे सर्वदूर अभिनंदन होत आहे.

