रघुपती मुरमाडे यांचा सवाल
अहेरी : पतसंस्थेच्या एकूण सभासदांपैकी 40 ते 42 सभासद मतदानापासून वंचित आहेत. त्यांचे नाव मतदार यादी मध्ये नाही. ते नियमित सभासद आहेत. कारण पतसंस्था स्पष्ट करू शकली नाही. लोकशाही प्रक्रियेमध्ये निवडणुकांना महत्त्वाचे स्थान आहे. शासन आमच्यावर विविध निवडणुकांच्या अंमलबजावणीची आणि जनजागृतीची जबाबदारी देते. आम्ही ती पार पाडतो. जनतेला मतदानासाठी प्रवृत्त करतो. पण पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये आम्हीच वंचित राहतो. याचे उत्तर पतसंस्थेकडे नाही. सत्तारूढ पॅनलने आम्हाला मतदानापासून वंचित ठेवले. नव्याने गठीत झालेल्या समता पॅनल कढून अपेक्षा आहेत. माझा कल समता पॅनल कडे आहे असे मत रघुपती मुरमाडे यांनी मांडले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिमारगुडा येथे ते प्राथमिक शिक्षक आहेत. वस्ती शाळा शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. शासनाने घेतलेल्या निर्णयान्वये ते नियमित झाले. वस्ती शाळा शिक्षकांच्या संघटनेचे ते नेतृत्व करतात. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. मतदानापासून वंचित राहिल्याची खंत ते व्यक्त करतात.
सेवेत नियमित झाल्यापासून जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीचा मी नियमित सभासद आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी गरिबीची असल्याने वस्तीशाळा शिक्षक म्हणून कामाला सुरुवात केली. संघर्ष केला. वस्ती शाळा शिक्षक नियमित झाले. कोणतेही आर्थिक कार्य करायचे म्हटल्यास रकमेची गरज पडते. शिक्षकांच्या हक्कांची संस्था असल्याने पतसंस्थेचा सभासद झालो. मार्च 2022 ला पतसंस्थेच्या सभासदांची यादी संबंधित विभागाकडे पाठविली. यातून 40 लोकांची नावे वगळण्यात आली. मी पण आहे. थकबाकीदार असल्यास मतदानाचा हक्क नाकारण्यात येतो. थकबाकी असेल तर लिखित पत्र हवे होते. कोणतेही लिखित पत्र मला प्राप्त झालेले नाही. पतसंस्था ही एक कायदेशीर संस्था आहे. तोंडी बोलण्याने होत नाही. अधिकृत पत्र आवश्यक आहे. मला कोणतेही पत्र मिळाले नाही.मी मतदानापासून वंचित का राहिलो ? यासंदर्भात विचारणा करण्यासाठी पतसंस्थेत गेलो असता याचे उत्तर मला मिळाले नाही. आता मला समता पॅनलच्या माध्यमातून पतसंस्थेमध्ये सुधारणा घडवून आणायची आहे असे ते म्हणाले.
40 ते 42 मतदार निवडणुकीपासून वंचित राहिल्याची खूप मोठी खंत आहे. यादी तयार होते.पतसंस्थेचे कर्मचारी यादीची खात्री करतात. अध्यक्ष, सचिव त्यावर नजर टाकतात. स्वाक्षरी होते. आणि त्यानंतरच यादी संबंधित विभागाकडे पाठवल्या जाते. तीन ते चार प्रक्रियांमधून यादी संबंधित विभागाकडे पाठवल्या जात असताना 40 ते 42 सभासद सुटतात.शोकांतिका आहे.
पतसंस्थेचे कार्यक्षेत्र अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्यासाठी आहे. उमेदवार देताना समता पॅनल कडून योग्य समन्वय राखण्यात आला. वस्ती शाळेच्या तीन शिक्षकांना पतसंस्थेची उमेदवारी देण्यात आली. हे तीनही उमेदवार वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चंद्रकांत कुळमेथे, सुधाकर दूर्वा व रमेश भोयर हे उमेदवार आहेत. रमेश भोयर यांनी पूर्वी भामरागड तालुक्यात काम केले. ही समता पॅनल ची जमेची बाजू आहे. बहुतेक वस्ती शाळा शिक्षक समता पॅनलच्या बाजूने आहेत. परिश्रम घेत आहेत. 13 पैकी 13 उमेदवार निवडून येतील असा विश्वास आहे.
सुधाकर दुर्वा अनुसूचित जाती /जमातीच्या गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दोन्ही तालुक्यात त्यांचा संपर्क आहे. या गटासाठी सुधाकर दुर्वा यांच्या रूपात योग्य उमेदवार देण्यात आला आहे. त्यांच्या उमेदवारीला समर्थन लाभत आहे. विजय नक्की आहे असे ते म्हणाले.
