बापू आत्राम यांचे मत
अहेरी : सोसायटी बचाव पॅनलच्या जाहीरनाम्यामध्ये क्रमांक 1 पासून तर 24 पर्यंत शिक्षक मतदारांना आश्वासने देण्यात आलेली आहे. देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यावर सोसायटी बचाव पॅनलचा भर असेल. मतदारांच्या हितासाठी जाहीरनामा तयार करण्यात आला. याकडे पाहून मतदारांनी सोसायटी बचाव पॅनलला आपलेसे करावे असे मत सर्वसाधारण गटातून निवडणुकीच्या मैदानात असलेले बापू बोंद्यालू आत्राम यांनी व्यक्त केले.
बापू बोंद्यालू आत्राम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा महागाव येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आलापल्ली येथे वास्तव्य करतात. नोकरीस जवळपास 25 वर्षाचा कार्यकाळ झाला आहे. विद्यमान अध्यक्ष राजू आत्राम यांचे ते सख्खे पुतणे आहेत. सेवानिवृत्तीच्या कारणास्तव राजू आत्राम पतसंस्थेच्या निवडणुकीपासून वेगळे झाले. बापू आत्राम यांच्या रूपाने पतसंस्थेमध्ये आत्रामांचे प्रतिनिधित्व करणारा कोणीतरी असावा हा उद्देश असेल किंवा नसेल पण बापू आत्राम यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. जिंकून येण्याचा त्यांना विश्वास आहे.
प्रश्न : आपल्या पॅनलचे किती उमेदवार निवडून येतील.
उत्तर : शिक्षक मतदारांचा प्रतिसाद उत्तम आहे. 13 पैकी 13 उमेदवार निश्चितच निवडून येतील. उमेदवारी देताना जुने आणि नवीन असे मिश्रण करण्यात आले. या समीकरणाचा फायदा मतदानात होईल असे वाटत आहे.
प्रश्न : किती टक्के मतदान होईल.
उत्तर : होळीच्या सणामुळे मतदानाबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. सलग तीन दिवसाच्या सुट्ट्या आल्या. एक सुट्टी घेतली तर चार सुट्ट्या मिळतात.नोकरी निमित्याने स्थानिक परिसरात वास्तव्य करणारा शिक्षक आपल्या मूळ गावी गेला आहे. मतदानाला बोलावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कारणास्तव मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रश्न : जाहीरनाम्यातील मुद्दे जोरकस नाही असे विरोधक म्हणतात.
उत्तर : आमचा प्रत्येक मुद्दाच विरोधकांना जोरकस वाटत नाही. आमच्या दृष्टीने मात्र योग्य आहे. आम्ही आमच्या मुद्द्याची शिक्षक मतदारांसोबत चर्चा करतो. त्यांना आमचे मुद्दे पटवून सांगतो. मतदारांना मुद्दे पडतात. क्रमांक 1 ते 24 पर्यंतचे आश्वासने पूर्ण करण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू.
प्रश्न : आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे.
उत्तर : आरोग्य विमा योजना आणि वाहन कर्ज योजना हे दोन महत्त्वाचे मुद्दे वाटतात. या योजना सुरू करण्यासंदर्भात या विषयाच्या तज्ञांशी आमची चर्चा सुरू आहे. निवडणुका नंतर आम्ही या योजनांची अंमलबजावणी करू.
