मुंजमकरांनी डागली वेलादीवर तोफ
अहेरी : यमाजी मुंजमकर सोसायटी बचाव पॅनलच्या सर्वसाधारण गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जिंकून येण्याचा त्यांना विश्वास आहे. 9 च्या जवळपास जागा सोसायटी बचाव पॅनलला मिळेल असे त्यांना वाटते.
पतसंस्था निवडणुकीच्या रिंगणात असलेले दोन्ही पॅनल एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. आग-पाखड करीत आहेत. पतसंस्थेची एटापल्ली येथे विस्तारित इमारत बांधण्यात आली. तीस लाखाचे बांधकाम 60 लाखावर गेले. यात गैरव्यवहार करण्यात आला असल्याचा आरोप समता पॅनल कडून होत आहे. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे. या विषयावर यमाजी मुंजमकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सोसायटी बचाव पॅनलची भूमिका मांडली. सोसायटी बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडून आल्यानंतर उपाध्यक्षपद भोगलेले विश्वनाथ वेलादी हे या इमारत बांधकामासाठी जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रश्न : बांधकाम गैरव्यवहारा संदर्भात आपले काय मत आहे.
उत्तर : जुन्या संचालक मंडळाने तीस लाखाचे अंदाजपत्रक तयार केले होते. या इमारतीला वाढविण्यात आले. यामुळे बांधकाम 60 लाखाच्या वर गेले. इमारत बांधकाम सुरू असताना या बांधकामाची जबाबदारी सोसायटीचे उपाध्यक्ष विश्वनाथ वेलादी यांच्याकडे देण्यात आली होती. तेव्हाही आणि आताही ते पंचायत समिती एटापल्ली येथे कार्यरत आहेत. बांधकामाचा दर्जा योग्य नाही असे वाटत असेल तर बांधकाम सुरू असताना विश्वनाथ वेलादी यांनी काय केले ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पॅनल सोडले. विरोधी पॅनल मध्ये जाऊन उमेदवारी मिळवली. आरोप करण्यात काही तथ्य नाही. समता पॅनलने विश्वनाथ वेलादी यांनाच जाब विचारावा असा उलट सवाल त्यांनी केला.
प्रश्न : सोसायटी बचावचे किती उमेदवार निवडून येतील.
उत्तर : प्रचंड स्पर्धा आहे दोन्ही पॅनल ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जबरदस्त प्रचार सुरू आहे. अतिरिक्त दावा करणार नाही. नऊच्या जवळपास सोसायटी बचाव पॅनलचे उमेदवार निवडून येतील. आमचे पॅनल सत्तेत येईल.
प्रश्न : विजयाबद्दल खात्री आहे काय.
उत्तर : मला माझ्या विजयाबद्दल निश्चित खात्री आहे. वस्ती शाळा शिक्षक ते प्राथमिक शिक्षक हा प्रवास छल्लेवाडा सारख्या दुर्गम गावात करीत आहे. विविध शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त्याने गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांशी जनसंपर्कात आहे. मतदार विश्वासपूर्वक मतदान करतील. आपण विजयी नक्कीच होऊ विश्वास आहे.
प्रश्न : निवडून आल्यानंतर काय कराल.
उत्तर : मनात विविध उपाय योजना आहेत निवडून आल्यानंतर त्याला मूर्त रूप देण्याचा प्रयत्न आपण करू. अनेक सुधारणा करावयाच्या आहेत. व्याजदर कमी करण्यावर भर असेल. पतसंस्थेचे पूर्णपणे संगणकीकरण करणे. एका क्लिकवर पतसंस्था सभासदांना माहिती मिळावी यासाठी आपण झटणार आहोत.
प्रश्न : पुन्हा भ्रष्टाचार बाहेर काढू म्हणजे नेमके काय.
उत्तर : पतसंस्थेच्या व्यवहारात प्रचंड गैरव्यवहार झालेला आहे. एका सभासदाने चार मुदत ठेवीच्या आठ मुदत ठेवी केल्या.ही रक्कम नेमकी कोणाची आहे.अजून उलगडा झालेला नाही या रकमेची विल्हेवाट लावण्यात येईल. पतसंस्थेतील जुना गैरव्यवहार एवढ्यावरच थांबत नाही. तर यापेक्षा पुन्हा अधिक गैरव्यवहार असण्याची दाट शक्यता आहे. तो बाहेर काढण्यावर सोसायटी बचाव पॅनलचा प्रयत्न आहे.
यमाजी मुंजमकर यांच्याशी बातचीत केली असता ते प्रचंड आशावादी जाणवले. ते निवडून तर येतीलच. सोबतच पतसंस्थेवर सोसायटी बचाव पॅनलची सत्ता बसेल असे त्यांचे मत आहे.

