अहेरी : अध्यापन पद्धतीत होणारे बदल प्रत्येक शिक्षकाला घरबसल्या कळावेत. प्राथमिक शिक्षक तंत्रस्नेही बनावे. शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे. दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण केंद्रप्रमुख व साधन व्यक्तींसाठी उपयुक्त असावे. अशा विविध बाबींसाठी विनोबा ॲपची निर्मिती करण्यात आली. जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत या ॲपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
यात शिक्षण उत्सव 2025 हा उपक्रम राबविण्यात आला. टॉप क्लस्टर इन गडचिरोली मध्ये पंचायत समिती अहेरीच्या देवलमरी केंद्राला सन्मानित करण्यात आले. देण्यात आलेला सन्मान केंद्रप्रमुख प्रवीण पुल्लूरवार यांनी स्वीकारला.
जिल्हाधिकारी अविशान्त पांडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, चौरे प्राचार्य जिल्हा व शिक्षण प्रशिक्षण संस्था गडचिरोली, बाळासाहेब पवार शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ), नाकाडे उपशिक्षणाधिकारी, संजय दालमिया ओपन लिंक फाउंडेशन यांची यावेळेस उपस्थिती होती.
शिक्षणाच्या अनुभवाबाबतीत शाळेतील 90% विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा प्रभाव असतो. विनोबा हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित ॲप आहे. भारतामध्ये उच्च गुणवत्तेवर आधारित के-टेन शिक्षण पद्धती आणण्याचा प्रयत्न आहे. शिक्षकांचा दैनंदिन कार्यक्रमातील वेळ वाचवून शिक्षकांना काही अर्थपूर्ण काम करण्यास वेळ मिळावा हा प्रयत्न विनोदच्या माध्यमातून होत आहे.
केंद्रप्रमुख प्रवीण पुल्लूरवार यांनी आपल्या केंद्रात या ॲप विषयी जनजागृती केली. शिक्षक, विद्यार्थी व जिल्हा परिषदेमध्ये समन्वय कसा साधला जाईल याविषयी प्रयत्न करीत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

