परीक्षा केंद्रास शिक्षणाधिकारी यांची भेट
प्रतिनिधी
बामणी:- सिरोंचा तालुक्यातील संत मानवदयाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बामणी येथील बारावीच्या परीक्षा केंद्रावर आज दिनांक 1 मार्च 2025 रोजी वासुदेव भुसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिरोली यांनी परीक्षा केंद्राला भेट दिली.
सविस्तर वृत्त असे की, आज एच. एस.सी. बोर्ड परीक्षेचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर दुपारी तीन ते सहा या दरम्यान होता. पेपर सुरू झाल्या काही वेळातच शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांनी पथकासह भेट दिली . संपूर्ण परीक्षा केंद्राची पाहणी करून एकूण उपस्थित विद्यार्थी, अनुपस्थित विद्यार्थी, प्राप्त झालेल्या प्रश्नपत्रिकांचा हिशोब आदी माहिती सविस्तर जाणून घेतली. आज या अर्थशास्त्र विषयाच्या पेपरला 159 नियमित विद्यार्थी तर एक विद्यार्थी अति तात्काळ ( Emergency) म्हणून असे 160 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु त्यापैकी 135 परीक्षार्थी उपस्थित होते तर 25 विद्यार्थी गैरहजर होते. प्रत्येकी 25 याप्रमाणे सात वर्ग खोल्यात परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली होती. माननीय शिक्षणाधिकाऱ्यांनी जवळपास दीड तास उपस्थिती दर्शवून परीक्षा केंद्राबाबत समाधान व्यक्त केले. यानंतर पंचायत समिती सिरोंचा गट साधन केंद्राच्या पथकाने भेट दिली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय गडचिरोली येथील परीक्षा पथकाने भेट दिली.
बैठे पथक म्हणून टेकडा ताला केंद्राचे केंद्रप्रमुख जे. एस. पेंदोर उपस्थित होते. या परीक्षा केंद्राचे केंद्र संचालक शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही. दाशरथी उपस्थित होते. तर सहाय्यक परिरक्षक म्हणून नरेश दुर्गे व परीक्षा विभागाचे प्रमुख म्हणून प्रभारी उच्च माध्यमिक शिक्षक विनोद बावणे हे होते. पर्यवेक्षिका म्हणून महिला शिक्षिका उपस्थित होत्या. पोलीस विभागाचा तगडा बंदोबस्त होता. परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेला शिक्षकेतर कर्मचारी म्हणून बी. सी. कोनम, शेख यांचे सहकार्य लाभले.
