एटापल्ली : स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व.दामोधर भगवानराव दैवलकर स्मृती प्रतिष्ठान, नागपुर तर्फे अति दुर्गम नक्षल प्रभावित क्षेत्रातील विनोबा प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा हेडरी ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
स्वातंत्र्य सेनानी स्व.दामोधर भगवानराव दैवलकर यांनी 1930 ते 1947 या कालावधीत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. 12 /09/1930 ते 27/0 1 /1931 पर्यंत दांडी यात्रा आंदोलन दरम्यान कारावास झाला. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन दरम्यान कारावात झाला. स्वतंत्र काळात राज्य शासनाने त्यांनी केलेल्या विशेष कामगिरीबद्दल सन्मान दिला.
कार्यक्रमास हेडरी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश रांजणकर, पोलीस मदत केंद्र सुरजागडचे प्रभारी अधिकारी विठ्ठल सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक नारायण सानप, ज्योति शिंदे, सोनेकर, सहाय्यक फौजदार डी. आर. कोडवते, वलके, सशस्त्र पोलीस हवलदार, राजेश दैवलकर, संजय उईके, राजेंद्र पवार, वीरेंद्र सौंदरकर, ए.एल. लील्हारे, मिलिंद वडपल्लीवार, डी. आर. नंदागवळी ,एन.ए. विजयकर ,नितीन गायकवाड, यश बाविस्कर, ए.ए.धनवीजय,पी. पी. हटवार, एस. एस. जानोरकर, यु. एस. डाबेराव ,आर. एस. निखाडे,एस. बी. शेवडे, सी. के. कायरवार, बी. आर. काळबांडे ,पी. डब्ल्यू. पिंगळे ,के. पी. मोमीन, के. एल. बघेले, जी. पी. म्हात्रे, आर. जी. आदे, ए. जे. जैस्वाल, आर. बी. ठवकर, एन पी पवार, ए. ए. चौधरी ,पी. एस. गोंदगे, आर. एन. वाघमारे ,के. डी. सोनवणे, यांच्यासह जिल्हा पोलीस दल गडचिरोली येथील पोलीस अंमलदार तसेच विनोबा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
स्वातंत्र्य सेनानी दामोधर भगवानराव दैवलकर स्मृती प्रतिष्ठान नागपूर तर्फे राबविलेल्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
