प्रतिनिधी
एटापल्ली : संस्कार संस्था एटापल्ली यांच्या वतीने, आर्य गुरुकुलम वडोदरा, गुजरात यांच्या सहकार्याने आणि विजय संस्कार व पूजा संस्कार यांच्या माध्यमातून संस्कार पब्लिक स्कूल, एटापल्ली येथे ० ते १४ वर्षे वयोगटातील बालकांसाठी निःशुल्क सुवर्णप्राशन सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम दर महिन्याच्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी आयोजित केला जात आहे. सुवर्णप्राशन हा आयुर्वेदातील एक महत्त्वाचा संस्कार असून, तो बालकांच्या शारीरिक आणि मानसिक विकासास मदत करतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, स्मरणशक्ती तीव्र होते आणि एकूण आरोग्य सुधारते.ही सेवा सर्वांसाठी निःशुल्क आहे, या सेवेत सहभागी होण्यासाठी पालकांनी आपल्या बालकांना नियमितपणे या सुवर्णप्राशन कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन संस्कार संस्था एटापल्ली, आर्य गुरुकुलम वडोदरा आणि विजय संस्कार व पूजा संस्कार यांच्या वतीने करण्यात आले आहे.हा उपक्रम पूर्णतः निःशुल्क असून अधिक माहितीसाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा.
