अहेरी : बोधिसत्व बहुउद्देशीय समाज मंडळ अहेरी कडून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती धम्मभूमी अहेरी प्रांगणात नुकतीच साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधिसत्व बहुउद्देशीय समाज मंडळ अहेरी चे अध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य रतन दुर्गे होते.
प्रसंगी प्राचार्य विष्णू सोनोने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार समाजाला दिशा देणारे आहेत. छत्रपतींचे कार्य सर्व समाजाच्या लोकांसाठी असल्याने प्रत्येकाने त्यांचा हा विचार स्वीकारावा व धर्म निरपेक्ष समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावेळेस त्यांनी केले.
ऋषी सुखदेवे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन करण दहागावकर यांनी केले तर आभार हरिदास ओंडरे यांनी मांडले.
आयोजित कार्यक्रमास संदीप ओंडरे, मलया दुर्गे, अनिल दहागावकर, प्रल्हाद ओंडरे, आनंद अलोणे,कपिल झाडे, चंद्रशेखर दुधे इत्यादींची यावेळेस उपस्थित होती
