अहेरी : पोलीस स्टेशन अहेरीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांची बद्ली झाल्याने त्यांच्या ठिकाणी हर्षल एकरे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले.
पोलीस निरीक्षक हर्षल एकरे हे या आधी सन 2011 ते 2014 पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात नक्सल विरोधी अभियान पथकात व इंटेलिजन्स ब्युरोत कार्यरत होते. तसेच नागपूर जिल्ह्यातील खापा, भिवापूर येथे पोलीस स्टेशन सांभाळले आहे. चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेत (एलसीबी) सेवा दिली. चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना महत्वपूर्ण व गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणले. गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होते.
यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील असल्याने आणि अनुभवी अधिकारी असल्याने अहेरी पोलीस स्टेशन सांभाळणे हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. अहेरी पोलीस स्टेशन येथे रुजू होताच अनेकांनी पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांचे अभिनंदन केले आहे.

