अहेरी:- महाराष्ट्र भाजपा प्रदेश समिती कडून राज्यातील सर्वच तालुका अध्यक्ष पदाची नव्याने निवड केली जात आहे. राज्य समिती कडून प्राप्त सूचनेनुसार रविवार दि. २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ४:३० वाजता अहेरी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात तालुकाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली. या पदासाठी विविध नावे चर्चेत होती. यात विकास रमेश तोडसाम यांच्या नावावर सर्वामत झाले. तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड झाली.
सदर निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी दामोधर अरिगेला यांच्या उपस्थितीत पार पडली.
सर्व पदाधिकाऱ्यांनी विकास तोडसाम यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

