प्रतिनिधी
भामरागड : राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे ‘STARS’ व समग्र शिक्षण अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली अंतर्गत गटसाधन केंद्र भामरागड द्वारा आयोजित, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण २.० या पाच दिवसीय प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन गटशिक्षणाधिकारी जे. एस. वडलाकोंडा यांचे मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र भामरागड येथे दिनांक १७/०३/२०२५ ते दिनांक २१/०३/२०२५ या कालावधीत करण्यात आले होते.
सदर प्रशिक्षणाचे औपचारिक उद्घाटन दिनांक १७ मार्च २०२५ रोजी गटशिक्षणाधिकारी जे. एस. वडलाकोंडा यांचे हस्ते पार पडला. याप्रसंगी भामरागड तालुक्यातील सर्व केंद्रातील केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणांतर्गत राष्ट्रीय शिक्षण धोरण – २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) – प्रस्तावना व संरचना, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) क्षेत्र क्रमांक १ ते ६., शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF) परिशिष्टे १ ते ८, क्षमता आधारित अध्ययन व अध्यापन प्रक्रिया., क्षमता आधारित मूल्यांकन – संकल्पना, क्षमता आधारित मूल्यांकन कार्यनीती., क्षमता आधारित प्रश्नप्रकार, क्षमता आधारित प्रश्ननिर्मिती कौशल्ये., विचारप्रवर्तक प्रश्न (TPQ), गटकार्य अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्ननिर्मिती, समग्र प्रगतिपत्रक (HPC) संकल्पना व पार्श्वभूमी, समग्र प्रगतिपत्रक (HPC) स्तरनिहाय स्वरूप या एकूण सोळा विषयांवर चर्चात्मक रित्या प्रशिक्षण देण्यात आले.
सदर प्रशिक्षणास कालिदास कुनघाडकर, किशोर मडावी , गजानन राठोड, गुलाब हांडे, गुरु नगरधने. कु. अनिता मेश्राम, विनोद कुमोटी यांनी सुलभकाची भूमिका बजावत पाच दिवसीय प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडले.

