एक हिंदी वर्तमानपत्र वाचायला घेतले. वर्तमानपत्र चाळता-चाळता महत्त्वाची बातमी दिसली. नव्यानेच गठीत झालेल्या दिल्ली सरकारच्या संदर्भात ही बातमी होती. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या सरकारमध्ये प्रवेश शर्मा नामक सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. दिल्लीच्या रस्त्याचा आणि नाल्यांचा प्रवेश शर्मा यांनी दौरा केला. अवस्था गंभीर दिसली. गंभीर अवस्था असलेल्या घटनास्थळावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवीले. तात्काळ रामआशिष सिंग नावाच्या कार्यकारी अभियंत्याला सस्पेंड केले. घरी पाठवले. पूर्ण बातमी वाचली. बातमीमध्ये करण्यात आलेले चित्रण ‘नायक ‘ मधल्या अनिल कपूर सारखे होते. आनंद वाटला. राजकारणात तूर्तास असे चित्र दिसत नाही. निवडणुका आल्या की ‘खंडीभर’ आश्वासने दिली जातात. संपल्या की कामाचा जोर ओसरतो. पद मिळाले की दुर्लक्ष व्हायला सुरुवात होते. दिल्लीत मात्र प्रवेश शर्मा आपल्या वाट्याला आलेल्या जबाबदारीचे ‘सोने’ करीत आहेत.
बातमी वाचताच प्राणहीता पोलीस उप मुख्यालय अहेरी ते विठ्ठल रखुमाई मंदिर अहेरी या रस्त्याचे दुर्दैवी चित्र डोळ्यापुढे आले. काल या रस्त्यावर डांबर टाकले. भिकारचोट सारखे काम कंत्राटदाराकडून सुरू आहे. चित्रकला स्पर्धेमध्ये प्राथमिक शाळेचे विद्यार्थी चित्रात रंग तरी मोठ्या प्रमाणात भरतात. पण या भिकारचोट कंत्रादाराने डांबराच्या रेषा सुद्धा धड ओढल्या नाही. कंत्राटदार ‘चाप्टर’ आहे हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्वच अधिकाऱ्यांना माहित आहे. हा कंत्राटदार रस्त्याचा दर्जा ‘मेंटेन’ करू शकत नाही. याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच कल्पना आहे. कंत्राटदाराने डांबर टाकलेच नाही. आणि माती मिश्रित गिट्टी पसरविली. नियमान्वये गिट्टी धुऊन टाकावी लागते. येथून 100 मीटर अंतरावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय आहे. महत्त्वाचा रस्ता असताना या विभागाचा एकही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नव्हता. अर्थातच कंत्राटदाराने या अधिकाऱ्यांचे खिसे गरम केले आहेत. म्हणून तर या कंत्राटदाराला सार्वजनिक बांधकाम विभाग एक वर्षापासून ‘झेलत’ आहे. समाज माध्यमांवर बांधकामाचा व्हिडिओ व्हायरल झाला तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपेतच आहेत. खरे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना ‘सस्पेंड’ करणे गरजेचे आहे. प्रवेश शर्मांचा कित्ता येथे गिरविला पाहिजे.
सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड पर्यंत दिल्ली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना क्षेत्रात दौरा करावयाचा आहे. आदेश प्रवेश शर्मा यांनी दिले. अधिकाऱ्यांची चामडी जाड झाली आहे. असे प्रवेश शर्मांनी फटकारले. बरोबर आहे. चुकीचे नाही. वातानुकूलित कक्षात बसून सगळेच अधिकारी जाड झाले.
गावातल्या गावात फिरायचे जीवावर येते. बाहेर काय जात असतील कल्पना करता येत नाही. अशी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापलीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची अवस्था आहे. सगळी कामे कागदावरच होत असण्याची शक्यता आहे. दोन-चार उच्चपदस्थ अधिकारी सस्पेंड झाले तेव्हाच यांना ‘दाल आटे का भाव ‘ आठवणार आहे म्हणून सस्पेंड करणे गरजेचे आहे.

