आलापल्ली : आल्लापल्ली व अहेरी परिसरातील बालकांना वेगवेगळ्या कला, कौशल्याचे धडे मिळावे. त्यांच्यातील सुतप्तगुणांना वाव मिळावा. उन्हाळी सुट्ट्या सत्कारणी लागाव्या या हेतूने डॉ. किशोर नैताम फाउंडेशन आल्लापल्लीच्या वतीने 10 मे 2025 ते 25 मे 2025 या दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नाममात्र शुल्क आकारून उन्हाळी शिबिर आयोजित केल्या जात आहे. शुल्कात सूट किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना शुल्क देणे शक्य नसल्यास अशांच्या होतकरू बालकांना मोफत प्रवेश दिल्या जाणार आहे.यासाठी ९४२२९८२११ या व्हाट्सअप भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. शुल्कात सूट किंवा गरजवंतांना संपूर्ण शिबिर मोफत करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न डॉ. किशोर नैताम फाउंडेशन अल्लापल्ली कडून केल्या जात आहे.
जिल्हा परिषद मुलींची शाळा आल्लापल्ली येथे सकाळी 6.00 ते 11:30 च्या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात निसर्ग सहल, पक्षी निरीक्षण, भटकंती, योगासने, ध्यान साधना, झुम्बा डान्स, अरेबिक डान्स, कॅरम, चेस, चव्हा-अष्टा, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, आदिवासी पारंपारिक नृत्य,पेंटिंग, चित्रकला, स्केचिंग, वारली आर्ट, मधुबनी आर्ट, मंडला आर्ट,कराओके,नाट्य स्पर्धा पुस्तक वाचन इत्यादी उपक्रमांचा सहभाग या उन्हाळी शिबिरामध्ये करण्यात आला आहे.
