राजन्ना बिट्टीवार यांचे मत
अहेरी : दिनांक ५ मार्च 2025 ला निवडणूक चिन्ह मिळाले. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीच्या मैदानात असलेले दोन्ही पॅनलचे अधिकृत उमेदवार याच दिवसापासून निवडणुकीच्या प्रचाराला लागले. विमुक्त भटक्या जमाती गटातून सोसायटी बचाओ पॅनल राजन्ना बिट्टीवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याशी बातचीत केली असता निवडणूक स्पर्धेची असल्याची मत त्यांनी मान्य केले. प्रचारावर भर द्यावा लागणार असल्याचे त्यांनी कबूल केले.
प्रश्न – प्रचारात कोणता मुद्दा महत्त्वाचा आहे.
उत्तर – आम्ही प्रचारात अनेक मुद्दे उपस्थित करणार आहोत. सोसायटी बचाव पॅनलचा जाहीरनामा तयार होत असून जाहीरनामा तयार केल्यानंतरच अधिकृत भाष्य करता येईल.
प्रश्न – बाहेरगावच्या मतदारांचे कसे नियोजन कराल.
उत्तर – प्रत्येक मतदाराचे मतदान व्हावे असा प्रयत्न आम्ही आमच्या पॅनल कडून करणार आहोत. एटापली, भामरागड सहीत जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये सोसायटीचे मतदार आहेत. प्रत्येक मतदाराशी संपर्क करून त्यांना मतदानासाठी आग्रह केला जाणार आहे.
प्रश्न – लांबलेल्या कार्यकाळाबाबत तुमचे मत काय आहे.
उत्तर – कोणत्याही निवडणुकीचा कार्यकाळ पाच वर्ष असतो. पाच वर्षाच्या कार्यकाळानंतर निवडणुका व्हायलाच पाहिजे. 2021 मध्ये कोरोना होता. त्यानंतर एक वर्षाच्या आत निवडणुका घेणे गरजेचे होते. नऊ वर्षापर्यंत निवडणूक लांबली हे दुर्दैवी आहे. चौकशी व्हावी. याबाबत दुमत नाही.
प्रश्न – सत्तारूढ गटाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागते. याबाबत तुमचे मत काय आहे.
उत्तर – बरोबर आहे. सत्तारूढ गटावर प्रश्नांचा भडिमार होत असतो. पण आम्ही सक्षम आहोत. आमच्या पॅनलने मिळालेल्या कार्यकाळात शिक्षकांसाठी अनेक योजना राबविल्या. त्या योजना शिक्षकांसमोर ठेवून आम्ही मते मागणार आहोत.
प्रश्न – आपल्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराबाबत तुमचे काय मत आहे.
उत्तर – माझ्या विरोधात समता पॅनलचे दिवाकर लक्ष्मण मादेशी उभे आहेत. असे असले तरी सामना तोला-मोलाचाच होईल. अटीतटीच्या सामन्याची तयारी करूनच निवडणुकीच्या मैदानात आहे. अनेक शिक्षक संघटनेत काम केले असल्यामुळे शिक्षकांशी चांगला परिचय आहे.मी माझी बाजू त्यांच्यापुढे मांडणार आहे.
राजन्ना बिट्टीवार त्यांच्याशी बातचीत करताना ते प्रचंड आशावादी दिसले. विजयाचा आशावाद त्यांच्यात जाणवला. प्रत्येक मतदारांपर्यंत जाऊन प्रचार करण्याची आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
