आठ वाजता पासून मतदान
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था नोंदणी क्रमांक 186 च्या मतदानाचा दिवस उजाडला आहे. आज दि.16 मार्च 2025 ला सकाळी आठ वाजता पासून शिक्षक मतदारांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. निवडणुकीच्या मैदानात असलेले सोसायटी बचाव पॅनल आणि समता पॅनलने मतदारांच्या सोयीसाठी मंडप उभारणी केली आहे. सकाळी सात वाजता पासूनच निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार आणि समर्थक मंडपात दाखल झाले.
आज होऊ घातलेल्या निवडणुकीत फक्त दोनच पॅनल निवडणुकीच्या मैदानात आहेत. निवडणूक अटीतटीची आहे. एकूण 418 मतदार आहेत. 300 ते 350 मतदार अहेरी, आलापल्ली, भामरागड, एटापल्ली येथील आहेत. उर्वरित मतदार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या पंचायत समितीमध्ये कार्यरत आहेत. 60% पर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जास्तीत जास्त मतदान झाले पाहिजे.याकडे दोन्ही पॅनलचा कल असणार आहे. या अनुषंगाने दोन्ही पॅनलचे उमेदवार आणि समर्थक टाकण्यात आलेल्या मंडपात सकाळीच गोळा झाले आहेत.
आज आयोजित करण्यात आलेल्या मतदानासाठी दोन मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहे. अहेरी आणि एटापल्ली अशी दोन मतदान केंद्र आहेत. अहेरीचे मतदान केंद्र महत्त्वपूर्ण आहे. अहेरीच्या मतदान केंद्रावर मतदारांची संख्या जास्त आहे. सायंकाळी चार पर्यंत मतदानाची वेळ आहे. प्रत्येक मतदाराला घराबाहेर काढणे.मतदान केंद्रा पर्यंत आणणे.मतदान करून घेणे. ही जबाबदारी दोन्ही पॅनलवर आहे. मतदानाचा टक्का वाढल्यास विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. ही जाण दोन्ही पॅनलला असल्यामुळे दोन्ही पॅनलचे उमेदवार आणि समर्थक सकाळी सात वाजता पासूनच परिश्रम घेत आहेत.

