अहेरी : कॉपीमुक्त अभियानामुळे यावर्षी चर्चेत आलेल्या वर्ग 12 वी चा निकाल उद्या दिनांक 5 मे ला दुपारी 1 वाजता लागणार आहे. परीक्षा मंडळाकडून उद्या 11 वाजता पुणे येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर 1 वाजता परीक्षा मंडळाच्या वतीने बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
11 फेब्रुवारी 2025 ते 11 मार्च 2025 च्या दरम्यान यावर्षी वर्ग बारावीची परीक्षा घेण्यात आली. दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रक पेक्षा दहा दिवस आधीच परीक्षेला सुरुवात करण्यात आली. यामुळे यावर्षी लवकर निकाल हाती येईल. अशी अपेक्षा होती. त्यानुसार परीक्षा मंडळांनी यावर्षी तयारी केली. जवळपास एक महिना आधी निकाल देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार उद्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
यासंदर्भात परीक्षा मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी तसे अधिकृत प्रसिद्धी पत्रक काढून विविध प्रसार माध्यमांना कळविले आहे.
