सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांची प्रतिक्रिया
अहेरी : महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र भूषण गवई यांची देशाच्या 52 व्या सरन्यायाधीशपदी नुकतीच झालेली निवड अभिमानाची व भूषणावह बाब असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
पत्रकात सुरेंद्र अलोणे यांनी नमूद केले आहे की, सरन्यायाधीश भूषण गवई यांचे वडील रा. सु . गवई हे आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते होते, विधान परिषदेचे सलग तीस वर्ष सदस्य, त्याच दरम्यान सभापती व उपसभापती, लोकसभा व राज्यसभा सदस्य, बिहार व केरळ राज्याचे राज्यपालही होते. ऐतिहासिक नागपूर दीक्षाभूमी करिता रा. सु. गवई यांचे अतुलनीय कार्य होते. त्यांचे सुपुत्र देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशपदी वर्णी लागणे हे अभिमानाची बाब असल्याचे सुरेंद्र अलोणे यांनी पत्रकातून नमूद केले आहे.
पत्रकात पुढे त्यांनी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ शिक्षणाच्या व पेनाच्या टोकावर सामाजिक व ऐतिहासिक क्रांती घडवून आणली. शिक्षणाला ‘वाघिणीचे दूध..’ म्हटले. शिक्षणातूनच सर्वोच्च पदी व प्रशासकीय अधिकारी बनता येते त्यामुळे प्रत्येकानी दर्जेदार व उत्तमोत्तम शिक्षणाकडे लक्ष घालून चमकदारी कामगिरी करावे असे म्हणत सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अहेरीत दोनदा पदस्पर्श झाल्याचा उल्लेख व आनंद व्यक्त करून सुरेंद्र अलोणे यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पदी वर्णी लागल्याबद्दल भूषण गवई यांचे अभिनंदन केले आहे.

