दिल्ली : चूरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या लढतीत अखेर भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा सर केली. भारतीय जनता पक्षाने 48 जागा जिंकून विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. तर 22 जागा जिंकून आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला. काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
भारतीय जनता पक्षाकडून दिल्ली सर केल्यानंतर या केंद्रशासित प्रदेशाचा मुख्यमंत्री कोण असेल याकडे संपूर्ण देशवासी यांच्या नजरा लागल्या होत्या. यात माजी मुख्यमंत्री साहेब सिंग वर्मा यांचा मुलगा प्रवेश वर्मा यांचे नाव चर्चेत होते. भारतीय जनता पक्षाकडून या चर्चेला पूर्णविराम देण्यात आला असून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी शालिमार बागच्या विधानसभा सदस्य रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
रेखा गुप्ता या दिल्ली विधानसभेच्या महिला मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. सुषमा स्वराज, शीला दीक्षित, आतिषी यांच्यानंतर महिला मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री राहणार आहेत.
दिल्ली विधानसभेमध्ये तब्बल दहा वर्ष आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेवर होते. यावेळेस ची परिस्थिती अटीतटीची होती. भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाने निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. यात दिल्लीकरांनी कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने दाखविला. एकूण 48 जागांवर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला तर आम आदमी पक्षाने 22 जागा सर करीत आपले अस्तित्व कायम ठेवले.
भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने दिल्ली चा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न देशभरातील नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. वेगवेगळी नावे चर्चेत होती. यात माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचा मुलगा प्रवेश वर्मा यांचे नाव अग्रक्रमावर होते. त्यांचे नाव जवळपास निश्चित होईल अशी चर्चा राजकारण्यांमध्ये होती. आज भारतीय जनता पक्षाची उच्चस्तरीय बैठक दिल्ली येथे पार पडली. या दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असेल यावर खलबते झाली. शेवटी रेखा गुप्ता यांचे नाव पुढे आले आणि शिक्कामोर्तब झाले.
रेखा गुप्ता शालिमार विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव 25 हजार 595 मतांनी केला. त्या यापूर्वी दोनदा नगरसेवक राहिल्या आहेत. शालिमार बाग आणि प्रीतमपुरा या प्रभागातून त्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.
विद्यार्थी देशापासूनच त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सुद्धा त्यांनी काम केले आहे.
