प्रतिनिधी
अहेरी : निवडणूक चिन्ह मिळताच निवडणुकीच्या मैदानात असलेले उमेदवार विविध साहित्याचा वापर करून प्रचाराचा जुगाड करीत असतात. यात नोकरदार वर्गाच्या संघटना सुद्धा मागे नाही. असाच प्रकार जिल्हा परिषद सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीत रिंगणात असलेले उमेदवार करीत आहेत.
पतसंस्थेच्या या निवडणुकीत दोनच पॅनल आहेत. एक समता पॅनल आणि दुसरे सोसायटी बचाव पॅनल. सोसायटी बचाव पॅनलने टेबल चिन्हाची निवड केली. समता पॅनलने खुर्ची हे हलके-फुलके चिन्ह निवडले. या हलक्या-फुलक्या चिन्हाला जास्तीत जास्त लोकप्रिय कसे करता येईल याचा भन्नाट फंडा या पॅनलचे उमेदवार अविनाश कविराजवार यांनी शोधून काढला. दानशूर चौक अहेरी येथे एका दुकानावर खुर्ची बांधून प्रचाराचा जुगाड केला.
काल दिनांक 5 मार्च 2025 ला सहाय्यक दुय्यम निबंधक अहेरी यांच्या कार्यालयात निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. सोसायटी बचाव पॅनलने टेबल या चिन्हाची निवड केली. समता पॅनलने छत्री या चिन्हावर दावा केला. दोघांनाही मनाप्रमाणे चिन्ह मिळाले. छत्री हे चिन्ह हलकेफुलके चिन्ह समजले जाते. हाताळायला खूप सोपे आहे. छत्री हाताळत असताना कुणालाही त्रास होत नाही. छत्रीकडे लक्ष वळविण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरता येतात. अविनाश कविराजवार यांनी छत्री चिन्हाबाबत चांगलीच युक्ती केली. चिन्ह मिळाल्यानंतर स्वतःच्या घरची छत्री आणली.दानशूर चौकातील एका बॅटरी विक्रेत्याच्या दुकानावर बांबूला उघडलेल्या स्वरूपात बांधली. बांधलेल्या छत्रीकडे सगळ्यांचे लक्ष जात आहे. पावसापासून किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी सामान्यतः छत्री वापरल्या जाते. पावसाळ्यातच याचा वापर अधिक होतो. उन्हाळ्यात वापरणारे फार मोजके असतात. मग उन्हाळा आणि हिवाळ्याच्या मध्यावर एखाद्या बांबूला ही छत्री कशासाठी बांधली असावी असा प्रश्न या चौकात वावरणारे किंवा चौकातून वावरणारे करीत आहेत. या प्रश्नातून पतसंस्थेची निवडणूक असल्याचे उत्तर त्यांना मिळत आहे
अविनाश कविराजवार यांनी लढविलेल्या भन्नाट युक्तीची सर्वत्र प्रशंशा होत आहे. कसलेल्या उमेदवारासारखी युक्ती वापरून आपल्या पॅनलचा प्रचार करण्याचे कसब त्यांनी दाखवले असल्याची प्रतिक्रिया पतसंस्थेच्या मतदारांमध्ये उमटत आहे.
समता पॅनलचा प्रचार प्रभावीपणे व्हावा म्हणून आपण अधिकच्या संख्येने छत्रीचा वापर करणार आहोत. मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अहेरी-आलापल्ली च्या महत्त्वाच्या जागेवर उघडलेली छत्री बांधून मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचविण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
