सर्वसमावेशक अर्थसंकल्प- डॉ. प्रणय खुणे जि. उपाध्यक्ष भा. ज. प.
अहेरी : राज्यात औद्योगिक वाढ, पायाभूत सुविधा, कृषी सुधारणा आणि हरितक्रांती व ऊर्जेसह सर्व क्षेत्रांचा सर्वांगीण विकास राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पातुन साधला आहे. उद्योगविरहित गडचिरोली जिल्ह्यात लोहखनिज उद्योगासाठी 21 हजार 830 कोटींच्या गुंतवणुकीचे करार होणे ही बाब गडचिरोली जिल्ह्याला सुजलाम सुफलामतेकडे नेण्याच्या व सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचा टप्पा आहे. त्यातून केवळ मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीच होणार नाही, तर भौतिक सुविधांच्या बाबतीतही गडचिरोली जिल्हा मोठया प्रमाणात स्वयंपूर्ण होईल. याशिवाय प्रत्येक तालुक्यात बाजार समित्यांची स्थापना करण्याचा घेतलेला निर्णय राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या कृषीमालाला बाजारपेठ मिळण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रामुख्याने राज्यातील सर्वसामान्य गोरगरिबांच्या घरकुलांच्या अनुदानात 50 हजारांची वाढ करण्याचा निर्णय अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पातुन जाहीर केला. त्यामुळे हा केवळ महाराष्ट्राच्या समृद्धीला गती देणारा अर्थसंकल्प नसून महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचा ठोस कृती आराखडाच आहे. महाराष्ट्र राज्याला सुद्धा न्याय मिळाला आहे. गडचिरोली जिल्ह्याला सुद्धा न्याय मिळाला आहे असे मत अर्थसंकल्पा बाबत डॉ. प्रणय खुणे यांनी केले.
