अहेरी : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्ताने एम्प्लॉईज फॉर पीपल्स अँड स्टूडेंट अहेरीकडून उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी व एकलव्य मूकबधिर विद्यालय अहेरी येथे फळ, फरसाण, बिस्कीट व बुंदी वाटप करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी व नितीन दोंतुलवार, सामाजिक कार्यकर्ते अहेरी होते.
उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी येथील विविध विभागात दाखल असलेल्या रुग्णांना फळ,फरसाण, बिस्किट व बुंदी वाटप करण्यात आले. एकलव्य मूकबधिर विद्यालय अहेरी येथील विद्यार्थ्यांनाही फळ, फरसाण, बिस्कीट व बुंदी वाटप करण्यात आले. यावेळेस विद्यार्थ्यांसोबत सांकेतिक भाषेमध्ये चर्चा करून विद्यार्थ्यांची माहिती घेण्यात आली.
यावेळेस डॉ.संजय उमाटे, डॉ. समता मडावी, पूर्वा दोंतुलवार, सामाजिक कार्यकर्त्या अहेरी, अशोक दहागावकर, रघुपती मुरमाडे, सुरेश दुर्गे, जावेद अली, पेंदाम यांची उपस्थिती होती.
फळ, फरसाण, बिस्किट व बुंदी वाटप कार्यक्रम सुशीला भगत, डॉ.अलका बुरबुरे, किशोर सुनतकर, अविनाश दुर्गे, परशुराम दहागावकर यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आला होता.
यावेळेस रुग्ण व विद्यार्थ्यांचे मोठ्या संख्येने उपस्थित होती.

