अहेरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक व माजी प्राचार्य निळकंठराव बंडावार यांचे हस्ते शिवजयंतीच्या पर्वावर आज करण्यात आले.
35 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणारे या पुतळ्याचे बांधकाम नगरपंचायत तयारीच्या वतीने करण्यात येणार असून पुतळ्याच्या बांधकामाचे कंत्राट कंत्राटदार मनोज शेकुर्तीवार यांना मिळाली आहे.
आयोजित भूमिपूजन सोहळ्याला नगरसेविका सौ दिपाली नामेवार, सामाजिक कार्यकर्ते मुकेश नामेवार, प्राचार्य मनोरंजन मंडल, विनोद विश्वनादुलवार, मुख्याध्यापकांनी अनिल चिल्वेलवार, नितीन मद्देर्लावार इत्यादींची यावेळेस उपस्थिती होती.
प्राचार्य निळकंठराव बंडावार यांनी नारळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून व नारळ फोडून पुतळ्याच्या बांधकामाचा शुभारंभ केला. यानंतर जेसीबी या यंत्राच्या माध्यमातून प्राथमिक स्वरूपात काम सुरू करण्याची प्रक्रिया करण्यात आली.
राज्य सरकारच्या विशेष निधीतून 35 लाख रुपयाचा हा निधी नगरपंचायतीला प्राप्त झाला आहे. या 35 लाख रुपयांच्या निधीतून जुन्या उपकोशागार कार्यालयाच्या समोर असलेल्या मोकळ्या जागेत हा पुतळा बांधण्यात येणार आहे. पुतळ्यासाठी आवश्यक परवानग्या संबंधित मंत्रालयाकडून प्राप्त झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते मुकेश नामेवार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. पुतळ्याचा कबुतरा 15 फुटाचा असून उर्वरित 20 फुटात छत्रपती शिवाजी महाराज अश्वावर स्वार झाले असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
