डा. किशोर नैताम फाउंडेशन चा उपक्रम
आलापल्ली : दिनांक 12 मे 2025 ला किशोर नैताम फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या fly free उन्हाळी शिबिरात फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती डॉ सुमती नैताम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे विविध उपक्रम घेण्यात आले. शिबिराची सुरुवात ध्यान (meditation) ने करण्यात आली.
निरोगी राहण्यासाठी अधिक हालचाल आणि खेळ महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन कराटे प्रशिक्षण आणि खेळाचे आयोजन करण्यात आले. तसेच कला आणि हस्तकला याद्वारे विद्यार्थी सर्जनशील होतात यासाठी मुलांना वारली चित्रकला चित्र निर्मिती शिकवण्यात आली. वारली चित्रकला हो महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची पारंपारिक कला आहे व महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृध्दीचा एक भाग आहे. शेवटच्या तासिकेत art and craft( यात वेगवेगळ्या कला प्रकाराचा हस्तकलेचा समावेश असतो. ) यात प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षकाद्वारे कला निर्मिती करण्यात आली.
वर्गाच्या भिंतीपलीकडे शिकण्याच्या अनेक संधी मुलांना या शिबिरामध्ये देण्यात येत आहे.
प्रशिक्षक म्हणून कु शालीनी खोब्रागडे, श्री भांदककर, श्री विनोद खांडेकर, श्री खुर्शीद शेख, श्री मुकुंदा सडमेक, श्री मोतीराम गावडे इ. कार्य करीत आहे.
