अहेरी:-येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सोमवार 12 मे रोजी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रथमतः सेवा निवृत्त वन अधिकारी कनकदास ढोलगे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वज फडकावून सामूहिक रित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले आणि त्या नंतर महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत करून अभिवादन करण्यात आले.
वैशाख पौर्णिमा_बुद्ध जयंती निमित्ताने तिरूपती चालूरकर यांच्या तर्फे खीर दान व मंडळाच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
तसेच भीम गायक व प्रबोधनकार रमेश शेंडे व त्यांचे सहकारी जगदीश शिंदे यांनी भीम गीत उत्कृष्ट रित्या सादर केले.
या प्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सुरेंद्र अलोणे यांनी साऱ्या जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनिक तथागत गौतम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मानव कल्याणतेसाठी तथागत गौतम बुद्ध यांच्या विचाराने व बुद्ध तत्वज्ञानाने प्रेरित होऊन त्या दिशेने वाटचाल करावे असे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. यावेळी प्रशांत भिमटे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राहुल गर्गम यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होते. यशस्वीतेसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.
