विश्वदीप वाळके
गडचिरोली, ०३ एप्रिल २०२५ – सामाजिक न्याय आणि मानवाधिकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या विश्वदीप वाळके यांची भारतीय मानवाधिकार परिषद (HRCI) च्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत परिषदेने त्यांना ही जबाबदारी दिली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मानवाधिकार जागृती आणि संरक्षणासाठी विश्वदीप वाळके यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.आदिवासी,गरीब आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सामाजिक प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे कार्य केले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना विश्वदीप वाळके म्हणाले, “गडचिरोली जिल्ह्यात मानवाधिकार संरक्षणासाठी कटिबद्ध राहून कार्य करणे ही माझी प्राथमिकता असेल.गरजू आणि वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
त्यांच्या या निवडीबद्दल अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

