डॉ. प्रणय खुणे
प्रतिनिधी
अहेरी : भारत हा विविध धर्मीयांचा देश आहे. प्रत्येक धर्मियांमध्ये वेगवेगळे सण साजरे होतात. रमजान हा मुस्लिम संस्कृती मधला महत्त्वाचा सण आहे. प्रत्येकांनी शुभेच्छा देऊन सर्वधर्मसमभावाची संकल्पना राबवावी असे मत राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी केले.
रमजान महिन्या निमित्ताने मदरसा अहेरी येथे गरिबांना वस्त्रदान आणि गरजू महिलांना शेवया वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळेस ते बोलत होते.
आयोजित कार्यक्रमाला राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा उपाध्यक्ष महेश अलोणे, जिल्हा सचिव रतन दुर्गे, अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, सचिव साईनाथ औत्कार, सहसचिव सुरेश दुर्गे, सदस्य रोशन सय्यद, अमोल अलोने इत्यादींची यावेळेस उपस्थिती होती.
मदरसा अहेरी येथे ठेवण्यात आलेल्या या कार्यक्रमात पुढे बोलताना ते म्हणाले की, मुस्लिम बांधव तीस दिवस अल्लाची उपासना करतात. आराधना करतात. लहान-मोठे यात सहभागी होतात. न खाता-पिता सकाळपासून सायंकाळपर्यंत करण्यात येणारे हे उपवास प्रशंसनीय आहेत. आमच्या सगळ्यांच्या या उपवासासाठी शुभेच्छा आहेत असे ते म्हणाले. प्रसंगी उपस्थित लहान मुलांना डॉ. प्रणय खुणे यांच्या हस्ते वस्त्रदान करण्यात आले. महिलांना आनंदाचा शिधा म्हणून शेवळ्यांचे वाटप करण्यात आले.
प्रसंगी मुस्लिम व अन्य समाज बांधवांची यावेळेस उपस्थिती होती.

