मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट
आलापल्ली : राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानक या गुणवत्ता मानक उपक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली राज्य स्तरीय गुणवत्ता हमी मानकसाठी नामनिर्देशीत करण्यात आली. या निमित्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डा प्रताप शिंदे यांनी आज प्राथमिक आरोग्य केंद्र आलापल्ली ला भेट देऊन तपासणी केली.
राष्ट्रीय गुणवत्ता मानक कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण जिल्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, आलापल्लीचे नाम निर्देशन राज्य स्तरीय गुणवत्ता हमी माणकासाठी पात्र ठरले.
प्रा. आ. केंद्र आलापल्ली येथे उपलब्ध असलेल्या सोयीची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डा प्रताप शिंदे यांनी भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे निरीक्षण करून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची प्रशंसा केली. यावेळेस विविध सूचना केल्या.
प्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डा किरण वानखेडे, वैद्यकीय अधिकारी डा अल्का उईके, डा दर्शना राऊत, डा गणेश लाडस्कर व कर्मचारी उपस्थित होते.
