प्रतिनिधी
एटापल्ली : केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या 191 या बटालियन कडून परिसरातील दहा गरजूंना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले व किट साहित्य वाटप करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपकमांडंट उमाशंकर होते. प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ. एस अन्नथू होते.
दिनांक 5 मार्च 2025 पासून 9 मार्च 2025 पर्यंत 191 बटालियन एटापल्ली येथे पाच दिवसाचे मधमाशी पालन प्रशिक्षण देण्यात आले. श्लोक बारापात्रे, प्रशिक्षक नागपूर यांनी मधमाशी पालनाच्या विविध बाबी यावेळी समजून सांगितल्या. शास्त्रशुद्ध मधमाशी पालन करून आर्थिक उत्पन्न कसे वाढवता येईल हे त्यांनी सांगितले.
प्रसंगी उपकमांडंट उमाशंकर यांनी कीट वाटप करताना आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की स्थानिक परिसरात मधमाशांचे पालन करण्यासाठी चांगले वातावरण आहे. देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा शास्त्रशुद्ध वापर केल्यास अनेकांना पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाला स्वीकारता येते. आर्थिक उत्पन्न मर्यादित न ठेवता त्याला वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न व्हावा हा या मागचा हेतू असल्याचे त्यांनी.
मधमाशी पालन किट वाटप कार्यक्रमाचे संचालन निरीक्षक सेवा शंकर योगी यांनी केले. आभार निरीक्षक सत्यपाल अग्रवाल यांनी मांनले. कमांडंट सत्यप्रकाश यांच्या मार्गदर्शनात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
