अहेरी : शालेय विद्यार्थीनी सोबत अशोभनिय वर्तन करणारा मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेटा येथील प्राथमिक मुख्याध्यापक रवींद्र गव्हारे याने शालेय विद्यार्थिनी सोबत अशोभनीय वर्तन केल्याची तक्रार उप पोलीस स्टेशन लाहेरी येथे करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून दहा दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली होती. मिळालेल्या पोलीस कोठडीच्या कालावधीत तपास पूर्ण झाल्याने काल दिनांक 10 मार्च 2025 ला पुन्हा रवींद्र गव्हारे याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय अहेरी येथे आणण्यात आले. दृक-श्राव्य माध्यमातून गडचिरोली येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शीतरे यांच्यापुढे उपस्थित करण्यात आले. यावेळेस त्यांनी रवींद्र गव्हारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
