प्रतिनिधी
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणुकीत सोसायटी बचाव पॅनल हे सत्तारुढ पॅनल यावेळेस सुद्धा निवडणुकीच्या रणमैदानात आहे. या पॅनलने संचालक मंडळाच्या 13 जागेवर आपले उमेदवार उभे केले आहे. आज चिन्ह वाटपाच्या दिवशी सोसायटी बचाव पॅनलच्या उमेदवारांनी ‘टेबल’ हे चिन्ह स्वीकारले.
या पॅनलच्या वतीने व या पॅनल कडून अध्यक्षपदासाठी पुढे करण्यात आलेले महेश मडावी हे सकाळी 11 वाजता सहाय्यक दुय्यम निबंधक अहेरी येथे प्रामुख्याने यावेळेस उपस्थित दिसले. त्यांच्यासोबत अन्य काही उमेदवार सुद्धा उपस्थित होते.
समता पॅनल कडून छत्रि या चिन्हावर दावा करण्यात आल्याने सोसायटी बचाव पॅनलने टेबल या चिन्हाचा स्वीकार केला. टेबल हे या परिसरातील प्रचलित चिन्ह आहे. स्थानिक परिसरातील एक राजकीय संघटना टेबल या चिन्हाचा निवडणुकीत वापर करीत असते. प्रचलित चिन्ह वापरले तर ते सोयीचे होऊ शकते या हेतूने सोसायटी बचाव पॅनल कडून टेबल या चिन्हाचा स्वीकार केला गेला असावा असे सांगण्यात येत आहे.
टेबल चिन्ह मिळाल्याने सोसायटी बचाव पॅनल मध्ये सुद्धा जल्लोष दिसला. प्रत्येक शिक्षक मतदारांपर्यंत टेबल पोहोचला पाहिजे या हेतूने सोसायटी बचाव पॅनलचे उमेदवार आणि समर्थक कामाला लागणार असल्याचे सांगण्यात आले.
