प्रतिनिधी
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था नोंदणी क्रमांक 186 ची निवडणूक चांगलीच गाजत आहे. या निवडणुकीत सत्तारूढ सोसायटी बचाव आणि समता असे दोन पॅनल तयार झाले आहेत. या पॅनलच्या उमेदवारांकडे नजर टाकली असता या दोन्ही पॅनलने एकूण सहा उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे.
यात सोसायटी बचाव पॅनलने चार संचालकांना मैदानात उतरवले तर समता पॅनेलने दोन संचालकांना मैदानात उतरवले आहे.
दिनांक 16 मार्च 2025 ला होणाऱ्या पतसंस्थेच्या निवडणुकीत एकूण 27
उमेदवार रिंगणात आहेत. दोन्ही पॅनल ने 13-13 उमेदवार उभे केले तर दिवाकर वाघमारे यांच्या स्वरूपात एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहे.
एकूण 27 उमेदवारांच्या नावाकडे लक्ष टाकले तर 6 संचालक विद्यमान कार्यकारणी मध्ये असल्याचे दिसते. यात विश्वनाथ वेलादी, जानकीराम पुलगमकर, वनिता कन्नाके, टारझन सुरजागडे, निलेश विशरोजरोजवार आणि महेश मडावी यांचा समावेश आहे. विश्वनाथ वेलादी आणि वनिता कन्नाके हे विद्यमान दोन संचालक समता पॅनल कडून नशीब आजमावत आहेत. टारझन सुरजागडे, जानकीराम पुलगमकर, निलेश विशरोजवार आणि महेश मडावी हे सोसायटी बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संस्थेच्या कार्यपद्धतीची जुन्या संचालकांना चांगलीच जाण आहे.
जुने 6 संचालक निवडणुकीच्या मैदानात असल्याने या निवडणुकीचे महत्त्व वाढले आहे. जुन्या संचालकांना संस्थेच्या कार्यपद्धतीची जाण चांगली आहे. त्याचा फायदा निवडणुकीत होताना दिसतो. बाजू पटवून सांगताना युक्तिवाद करताना या संचालकाचा अनुभव कामात येत आहे. याच कारणास्तव पुन्हा या संचालकांना या दोन्ही पॅनलने निवडणुकीच्या मैदानात उतरविले असल्याचे सांगण्यात येते.
