विनोद भोसले यांचा वाढदिवस साजरा
अहेरी : नजीक असलेल्या प्राणहिता नदीच्या वांगेपल्ली घाटावर क्रीडा शिक्षक व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त स्काऊट गाईड शिक्षक विनोद भोसले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळेस पाच स्त्रियांनीऔक्षवण केले. प्रसंगी त्यांच्या आठवणी सांगितल्या. यात शिक्षक निकुरे, सत्यनारायण गुप्ता, मुरलीधर मद्दीवार. अरुण धुर्वे, छाया पुदटवार यांनी विनोद भोसले यांच्या कार्यकर्तुत्वावर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे म्हणून शरद सप्रे उपस्थित होते. राजेश्वर रंगुलवार. विलास नवनूरवार, सुधाकर रापर्तीवार, लिपिक कन्नाके, नानाजी जक्कोजवार, विजय मद्देर्लावार, सर्वेश्वर कारंगुलवार, रमेश कस्तुरवार, उमेश गुप्ता, अशोक मंथनवार, बंडू गुरनुले, नामदेव साखरे यांची उपस्थिती होती. विनोद भोसले यांनी केवळ शिक्षक म्हणून काम केले नाही तर सामाजिक जाणीव जोपासत विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना घडविण्याचे कार्य केले. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या नियमित स्मरणात राहील असे मत अनेकांनी व्यक्त केले.
शाळेतील शिक्षक, पालक वर्ग, शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश ठिकरे यांनी केले.
