प्रतिनिधी
अहेरी : भारताचे क्रिकेटशी घट्ट नाते जोडले आहे. देशात क्रिकेटचा सामना जिंकल्याचा क्षण सणासारखा साजरा होतो. भारत आणि न्यूझीलंडमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आज अंतिम सामना होता. भारतीय फलंदाजांनी धावांचे उद्दिष्ट सहज पार केले. सामना जिंकला. फटाक्याची आतिषबाजी करून अहेरीकरांनी आनंद साजरा केला.
49 व्या शतकात मैदानावर के. एल. राहुल याने चौकार ठोकला. विजयावर शिक्कामोर्तब केले. सोबतीला रवींद्र जडेजा होता. दुबईतील शारजा येथे सुरू असलेल्या या सामन्याची प्रत्येकांना उत्कंठा होती. भारतीय समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंतिम सामना असल्याने बहुतेक अहेरीकर दूरचित्रवाणी आणि भ्रमणध्वनीच्या माध्यमाने सामन्याचा आनंद घेत होते. मध्यंतरीच्या षटकांमध्ये गडी बाद होण्याचा क्रम वाढल्याने जोखीम वाटत होती. पण न्युझीलँड कडून मिळालेले उद्दिष्ट भारतीय फलंदाजांनी लीलया पेलले. निर्णय भारताच्या बाजूने फिरविला.
शारजा येथे होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये तब्बल 12 वर्षानंतर भारताला हा विजय साकारता आल्याने अहेरीकरांनी अर्ध्या तासाच्या जवळपास फटाके फोडून विजयाचा आनंद साजरा केला जिकडे तिकडे फटाक्याचा आवाज निनादत होता. एकमेकांना शुभेच्छा देण्यात अहेरीकर व्यस्त झाल्याचे जाणवले.
