संविधानावर चर्चासत्र
अहेरी : भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने देशभरात घर घर संविधान अंतर्गत प्रत्येक महिन्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यांचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडअहेरी येथील मुख्याध्यापक संजय कोंकमुट्टीवार यांनी विद्यार्थ्यांसाठी संविधानाचे महत्व यावर चर्चासत्राचे आयोजन केले. संविधान सभा निर्मिती, मसुदा समिती, अध्यक्ष, संविधानाचा इतिहास, आलेले आव्हान, कलमे, इत्यादी माहिती देऊन प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तीसरी ते पाचवी चे विद्यार्थी चर्चासत्रात सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारून हिरहिरीने सहभाग घेतला.
चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी शालेय मंत्रीमंडळाने चांगली तयारी केली.
शाळेत नेहमीच असेच वैविध्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालून, त्यांच्या अनुभवाच्या कक्षा रुंदावत राहील असेच प्रयत्न केल्यास जाते. याबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
