तहसीलदारा मार्फत राष्ट्रपतींना निवेदन
प्रतिनिधी
अहेरी : भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाला 218 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून जम्बुदीप शासक मौर्य सम्राट अशोकाने 84 हजार बौद्ध स्तूपांची निर्मिती केली. यापैकी एक म्हणजे बुद्धगया येतील महाबोधी विहार आहे.
भारतीय स्वातंत्र्यानंतर 1949 ला बोधी टेम्पल मॅनेजमेंट अॅक्ट ची निर्मिती करण्यात आली. यानुसार महाविहाराच्या व्यवस्थापन मंडळात चार बौद्ध आणि पाच गैर बौद्धांचा समावेश करण्यात आला. हा प्रकार पटणारा नसून सदर महा विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे दिनांक 12 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बौद्ध समाज मंडळ अहेरी च्या वतीने राष्ट्रपती भारत सरकार यांना निवेदन पाठवण्यात आले. निवेदन तहसीलदार अहेरी यांच्यामार्फत पाठवण्यात आले.
इसवी सन पूर्व 528 मध्ये वयाच्या 35 व्या वर्षी भगवान बुद्धांनी बोधगया येथील पिंपळाच्या झाडाखाली ध्यान केले. तपश्चर्या केली. शरीराला त्रास देण्यात काहीही अर्थ नाही. मनुष्याला दुःख आहे आणि दुःख मुक्तीचा मार्ग सुद्धा मनुष्यालाच शोधायचा आहे. असा मध्यम मार्ग त्यांनी स्वीकारला. इथूनच आर्य अष्टांगिक मार्गाची निर्मिती झाली. या मार्गाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी उभ्या आयुष्यभर केला. त्यांचा मध्यम मार्ग साऱ्या जगाने स्वीकारला.
असे असले तरी भारतीय स्वातंत्र्यानंतर 1949 ला बोधी टेम्पल मॅनेजमेंट ॲक्टची निर्मिती करण्यात आली. यात पाच गैर बौद्धांचा समावेश करून या मंदिराच्या व्यवस्थापन मंडळातून बौद्धांना डावलण्यात येत आहे. 2002 मध्ये महाबोधी विहार बोधगया चा समावेश युनेस्को च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला. उपलब्ध शिल्पा सह लागलेल्या पुरातत्वीय शोधा नुसार मौर्य काळापासून या स्थळाचा बौद्ध वापर करीत असल्याचे स्पष्ट दिसते. असे असले तरी महाबोधी विहाराचा ताबा पूर्णपणे बौद्धांकडे सोपवण्यात आला नाही. महाबोधिविहाराचा ताबा बौद्धांकडे सोपवण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण देशातले आणि जगातले बौद्ध बांधव या ठिकाणी गोळा झाले आहेत. 12 फेब्रुवारी 2025 पासून आंदोलन सुरू केले आहे.
