भाजीपाला विक्रेत्यांची मागणी
अहेरी : बाराही महिने भाजीपाला विक्री सोयीची व्हावी म्हणून नगरपंचायत अहेरी कडून भाजीपाला विक्रेत्यांसाठी पक्के शेड तयार करण्यात आले. तयार करण्यात आलेले शेड टीनाचे आहे. कडक उन्हाला सुरुवात झाली आहे. एप्रिल महिन्याच्या मध्यावरच पारा 45 अंश सेल्सिअस वर पोहोचला आहे. भर उन्हात भाजीपाला विक्रेत्यांना दिवसभर भाजीपाला विकावा लागतो. रात्री उशिरापर्यंत भाजीपाला विक्रेते भाजीपाला विकतात. नगरपंचायत अहेरीकडून भाजीपाला विक्रेत्यांच्या सोयीसाठी शेड तयार करण्यात आले असले तरी विजेची सोय मात्र करण्यात आली नाही. दिवसभर उन्हात आणि रात्री अंधारात भाजीपाला विकण्याची वेळ भाजीपाला विक्रेत्यांवर आली आहे. तयार करण्यात आलेल्या शेडमध्ये सार्वजनिक किंवा वैयक्तिक स्वरूपाची वीज देण्याची व्यवस्था नगरपंचायत कडून करण्यात यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांकडून होत आहे.
तीन महिन्यापूर्वी नगरपंचायत अहेरीकडून दैनंदिन भाजीपाला विक्री करणाऱ्यांसाठी कायमस्वरूपी मोठे शेड तयार करण्यात आले. शेड तयार करण्यात आले असले तरी या ठिकाणी विजेची कोणतीही व्यवस्था नगरपंचायत अहेरी कडून करण्यात आलेली नाही. सार्वजनिक खांबावर विजेचे हाय मास्क लाईट लावण्यात आलेले आहे. या हाय मास्क लाईटचा प्रकाश शेडमध्ये येत नाही. रात्रीच्या दरम्यान येथे अंधार असते. रात्री जवळपास आठ पर्यंत भाजीपाला विक्रेते भाजीपाल्याची विक्री करतात. अंधार झाला की भाजीपाला विक्रेत्यांना अंधारातच व्यवसाय करावा लागतो. ग्राहकांना मोबाईलच्या प्रकाशात भाजीपाला खरेदी करावा लागतो.
एप्रिल महिन्यातच कडक उन्हाला सुरुवात झाली आहे. मे आणि जून अजून शिल्लक आहे. पारा 45 डिग्री सेल्सिअसच्या वर पोहोचला. मे जून मध्ये 47, 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान पोहोचण्याची शक्यता आहे. दिवसेंदिवस वाढत्या तापमानात भाजीपाला विक्रेत्यांनी आपला व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेडमध्ये सार्वजनिक स्वरूपाची किंवा वैयक्तिक स्वरूपाची वीज व्यवस्था केल्यास कुलर सारखे उपकरण, विजेचे दिवे वैयक्तिकरित्या येथे लावता येतात. दैनंदिन गुजरी बाजारावर नियंत्रण नगरपंचायतचे आहे. भाजीपाला विक्रेत्यांना येथे वैयक्तिक वीज पुरवठा घेता येत नाही. नगरपंचायत कडून महावितरण कडे अर्ज केला जाऊ शकतो आणि वैयक्तिक मीटर दिल्या जाऊ शकते.
गेल्या तीन महिन्यापूर्वी पासून येथे शेडची व्यवस्था केल्या गेली असली तरी विजेकडे मात्र नगरपंचायतीचे लक्ष नाही. याकडे नगरपंचायतीने लक्ष द्यावे. वैयक्तिक स्वरूपाची वीज व्यवस्था करून द्यावी अशी मागणी भाजीपाला विक्रेत्यांनी

