भामरागड : बिनागूंडा येथील सायबी दूर्वा (सायबी गायता ) उर्फ साहीबा पाटील यांचे निधन झाले. सायबी गायता १०० वर्षा पेक्षा अधिक काळ जिवंत राहिले. भामरागड तालुकातील सर्वात महत्त्वचा व्यक्ति होते. बिनागुंडा सारख्या अतिदुर्गम आणि अति संवेदनशील भागात हिंदी भाषा समजणारा आणि बोलणारा त्या काळात एकमेव व्यक्ती म्हणजे साहीबा पाटील होय. रेंगाल आंगी ओसो कटवके म्हणजेच लाल कपडे आणि मोठे जूते घतलेले लोक घोड्यावर बसून बिनागूंडा गावात आले होते. असे पर्यटकांना ते नेहमी सांगायचे. साहेबी पाटील यांच्या या चर्चेवरून बिनागुंडा परिसरात इंग्रजांची नेहमी वर्दळ असायची या चर्चेला पुष्टी मिळते. विना गोंडा व परिसरात आदिम संस्कृती व रितीरिवात जोपासण्याचे कार्य साहेबी पाटील यांच्याकडून होत होते. माडिया, बडामाडीया समुदायात त्यांचे आदराचे स्थान होते. साहेबी पाटील दीर्घ काळापासून आजारी होते. आज त्यांचे निधन झाले. मनमिळाऊ आणि सकारात्मक विचारांचे ते धनी होते. अंतिम संस्कार बिनागूंडा येथे करण्यात येणार आहे.

