दिवाकर मादेशी पुरस्कृत
मुलचेरा : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय उपक्रम स्पर्धा सन 2024-25 अंतर्गत 58 उपक्रमशील शिक्षकांनी नवोपक्रम उपक्रम सादर केले. त्यात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील फेरीतील सादरीकरणानतंर प्राथमिक गटातून पाच शिक्षकांची निवड व माध्यमिक गटातून 3 शिक्षकांची निवड करण्यात आली. यात ‘माझी हजेरी घेण्याची पद्धत अनोखी” या उपक्रमाला पसंती दर्शवित जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आंबटपल्ली येथील उपक्रमशील शिक्षक दिवाकर लक्ष्मण मादेशी यांची प्राथमिक गटातून चौथ्या क्रमांकावर निवड करण्यात आली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली तर्फे प्राचार्य चौरे, चापले वरिष्ठ अधिव्याख्याता, मते वरिष्ठ अधिव्याख्याता , मातकर अधिव्याख्याता, श्रीमती यगलोपरवार वरिष्ठ अधिव्याख्याता यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यातील विनोबा ॲप जानेवारी महिन्याच्या मॉर्निंग असेंबली मध्ये दिवाकर माझ्याशी यांची निवड झाली होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता.
अल्पावधीतच दिवाकर मादेशी यांना दोन पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वच स्तरात अभिनंदन होत आहे.

