६ एप्रिल
१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
१८९६: आधुनिक ऑलिम्पिक खेळांची ग्रीसमधील अथेन्स येथे सुरूवात झाली. ग्रीक सम्राट थेडोसियस (पहिला) याने घातलेल्या बंदीमुळे १५०० वर्षे हे खेळ बंद होते.
१९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
१९६५: व्यापारी उपयोग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्ली बर्ड हा उपग्रह अमेरिकेने अंतराळात सोडला
१९६६: भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी भारत व पाकिस्तानला जोडणारी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली.
१९८०: भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी तिचे पहिले अध्यक्ष झाले.
१९९८: भारतापर्यंत सहज पोहोचू शकणार्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली.
१९९८: स्तनांचा कर्करोग बरा करणार्या टॅमॉक्सीफेन या औषधाच्या चाचणीचे निकाल जाहीर करण्यात आले. या औषधामुळे होणार्या दुष्परिणामांमुळे गर्भाशयाच्या कर्करोगाची शक्यता वाढते, असे जाहीर करण्यात आले.
२०००: मीर या रशियाच्या अंतरिक्ष प्रयोगशाळेला जीवदान देण्यासाठी सोडलेले सोयूझ हे अंतराळयान मीर ला भेटले.
६ एप्रिल जन्म
१७७३: स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ जेम्स मिल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १८३६)
१८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १९३४)
१८९०: फोक्कर एअरक्राफ्ट मॅनुफॅक्चर चे निर्माते अँटनी फोक्कर यांचा जन्म. (मृत्यू: २३ डिसेंबर १९३९)
१८९०: उर्दू कवी व शायर अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९६०)
१८९२: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस यांकॅह जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९८१)
१९०९: भावगीतगायक व संगीतकार जी. एन. जोशी यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९४)
१९१७: मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर २००६)
१९१९: कोंकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म.
१९२७: उद्योजक विष्णू महेश्वर ऊर्फ व्ही. एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म. (मृत्यू: २८ जून २०००)
१९२८: फ्रान्सिस क्रीक व मॉरिस विल्कीन्स या जोडीदारांसह डीएनएची संरचना स्पष्ट करणारे नोबेल पारितोषिक विजेते जैवरसायनशास्त्रज्ञ जेम्स वॉटसन यांचा जन्म.
१९३१: बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४ – कोलकता, पश्चिम बंगाल)
१९५६: क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.
२०००: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहीन आफ्रिदी यांचा जन्म
१९८८: मिस वर्ल्ड पोर्तो रिको २००८, मॉडेल आणि दूरदर्शन होस्ट इव्होन ओरसिनी यांचा जन्म
१९६३: इक्वेडोरचे ५४वे अध्यक्ष, अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी राफेल कोरिया यांचा जन्म
१९५६: पाकिस्तानी क्रिकेटपटू मुदस्सर नजर यांचा जन्म
१९४९: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार हॉर्स्ट लुडविग स्टॉर्मर यांचा जन्म
१९२९: ग्रीस देशाचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायमूर्ती क्रिस्टोस सार्टझेटाकीस यांचा जन्म (मृत्यू : ३ फेब्रुवारी २०२२)
१९२०: स्विस-अमेरिकन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक – नोबेल पुरस्कार एडमंड एच. फिशर यांचा जन्म (मृत्यू : २७ ऑगस्ट २०२१)
१९२०: अमेरिकन पायलट आणि भौतिकशास्त्रज्ञ, टेसर गनचे संशोधक जॅक कव्हर यांचा जन्म (मृत्यू : ७ फेब्रुवारी २००९)
१९१८: बोलिव्हिया देशाचे ५६वे राष्ट्राध्यक्ष अल्फ्रेडो ओवांडो कॅंडिया यांचा जन्म (मृत्यू : २४ जानेवारी १९८२)
१९११: जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक, – नोबेल पुरस्कार फियोडोर फेलिक्स कोनराड लिनेन यांचा जन्म (मृत्यू : ६ ऑगस्ट १९७९)
१८८६: हैदराबाद राज्याचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खान यांचा जन्म (मृत्यू : २४ फेब्रुवारी १९६७)
१८२४: न्यूझीलंड देशाचे ७वे पंतप्रधान जॉर्ज वॉटरहाऊस यांचा जन्म (मृत्यू : ६ ऑगस्ट १९०६)
६ एप्रिल मृत्यू
११९९: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर ११५७)
१९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन.
१९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन.
१९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल जयंतोनाथ चौधरी यांचे निधन. (जन्म: १० जून १९०८)
१९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन. (जन्म: ७ मे १९१२ – मांडली, डुंगरपूर, राजस्थान)
१९९२: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९२०)
२०१४: इटालियन मोटरसायकल डिझायनर, बिमोटाचे सहसंस्थापक मॅसिमो तंबुरीनी यांचे निधन (जन्म: २८ नोव्हेंबर १९४३)
२००५: मोनॅकोचे प्रिन्स रेनियर III यांचे निधन (जन्म: ३१ मे १९२३)
२००३: अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ, अनिता बोर्ग इन्स्टिट्यूट फॉर वुमन अँड टेक्नॉलॉजीच्या संस्थापिका अनिता बोर्ग यांचे निधन (जन्म: १७ जानेवारी १९४९)
२०००: ट्युनिशिया देशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष हबीब बोरगुइबा यांचे निधन (जन्म: ३ ऑगस्ट १९०३)
१९९५: ग्रीस देशाचे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी इओनिस अलेव्ह्रास यांचे निधन
१९९४: रवांडा देशाचे ३रे अध्यक्ष, बँकर आणि राजकारणी जुवेनल हब्यारीमाना यांचे निधन (जन्म: ८ मार्च १९३७)
१९९४: बुरुंडी देशाचे ५वे अध्यक्ष सायप्रियन न्तार्यामिरा यांचे निधन (जन्म: ६ मार्च १९५५)
१९७९: बल्गेरियन आर्किटेक्ट, सिरिल आणि मेथोडियस नॅशनल लायब्ररीचे रचनाकार इव्हान वासिलीव्ह यांचे निधन (जन्म: २८ फेब्रुवारी १८९३)
१९७४: ऑस्ट्रेलियन पायलट आणि उद्योगपती, क्वांटास एअरवेज लिमिटेडचे सहसंस्थापक हडसन फिश यांचे निधन (जन्म: ७ जानेवारी १८९५
१९६१: बेल्जियन मायक्रोबायोलॉजिस्ट आणि इम्युनोलॉजिस्ट – नोबेल पुरस्कार ज्युल्स बोर्डेट यांचे निधन
१९४३: फ्रान्स देशाचे १२वे राष्ट्राध्यक्ष, वकील आणि राजकारणी अलेक्झांडर मिलरँड यांचे निधन (जन्म: १० फेब्रुवारी १८५९)
१८६४: ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ सर विल्यम हार्डी यांचे निधन (जन्म: २३ जानेवारी १९३४)
१४९०: हंगेरी आणि क्रोएशियाचे राजा मॅथियास कॉर्विनस यांचे निधन
एप्रिल महिन्यातील महत्त्वाच्या आणि विशेष घटना
भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.
गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
जालियनवाला बाग हत्याकांड, यात ३७९ लोक ठार तर १२०० जखमी झाले.
भारतात प्रथमच बोरीबंदर ते ठाणे प्रवासी रेल्वे सेवा सुरू झाली.
पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली खेड्यातील भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळस्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
होम रुल लीगची स्थापना झाली.
थोर समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म.

