लोक बिरादरीची भेट
भामरागड : तालुक्यालील लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय भामरागड येथे क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत भेट दिली.यावेळी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी किशोर बागडे यांचेशी चर्चा करून विविध प्रशासकीय कामकाजाची माहिती जाणून घेतली.
दि.२६ मार्च २०२५ ला लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा येथील इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत तहसील कार्यालय भामरागड येथे भेट दिली.सर्वप्रथम भामरागड तहसिल कार्यालयाची स्थापना , समाविष्ट गावे, विविध विभाग, तहसिलदार यांचे कार्य इत्यादी विषयी तहसिलदार किशोर बागडे यांनी माहिती दिली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष विभागास भेट देऊन माहिती घेतली. यात प्रामुख्याने विविध कागदपत्र विभाग ( उत्पन्न, आधिवास, जात प्रमाणपत्र इ. साठी अर्ज), शासकीय जमीन नोंद विभाग, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग, रोजगार हमी योजना विभाग, दिव्यांग योजना विभाग, आवक- जावक, अन्न पुरवठा निरिक्षक विभाग इत्यादी विभागांना भेट देऊन तेथील अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून विविध विभागाचे प्रत्यक्ष कामकाज समजून घेतले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले.विभागातील कर्मचाऱ्यांनी उत्तरे दिली व विद्यार्थ्यांचे समाधान केले.

