अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी नोंदणी क्रमांक 186 च्या निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तस तसा शिक्षक मतदारांमध्ये निवडणुकीच्या चर्चेचा ज्वर चढत आहे. निवडणुकीत सरळ सरळ दोनच पॅनल तयार झाले असल्याने ही निवडणूक आर-पारची होईल असे चित्र आता दिसायला लागले आहे. निवडणुकीत कोणती जोखीम घ्यायची नसल्याने पॅनल काही अतिरिक्त उमेदवारांचे अर्ज दाखल करीत असतात. तांत्रिक चुकीमुळे एखादी अर्ज रद्द झाला तर त्या ठिकाणी पर्याय देता यावा हा या मागचा हेतू असतो. सोसायटी बचाव पॅनल ने या हेतूतून तिघांचे अतिरिक्त अर्ज सादर केले होते. या तिघांनीही अर्ज काल दिनांक 27 फेब्रुवारीला परत घेतले आहे.
विद्यमान सत्तारूढ गटाकडून सोसायटी बचाव नामक पॅनल तयार करण्यात आले आहे. विद्यमान अध्यक्ष राजू आत्राम यांच्या नेतृत्वात सोसायटी बचाव पॅनलची निवडणूक लढविल्या जात आहे. सेवानिवृत्तीच्या कारणास्तव ते या निवडणुकीतून बाद झाले आहे. तरीपण त्यांनी निवडणुकीत आपला उत्साह टिकवून ठेवला आहे. सोसायटी बचाओ पॅनलच्या माध्यमातून प्रवीण पुल्लूरवार संतोष बड्डीवार, वसंत सडमेक यांच्या अर्ज सुद्धा सादर करण्यात आले होते या तिघांनीही काल आपले अर्ज मागे घेतले.
या संदर्भात प्रवीण पुल्लूरवर यांची प्रतिक्रिया घेतली असता पर्यायी उमेदवार म्हणून आपण अर्ज सादर केला होता असे त्यांनी सांगितले. कामाचा व्याप आणि कौटुंबिक जबाबदारी या कारणास्तव आपण या निवडणुकीसाठी उत्सुक नसल्याचे त्यांनी सांगितले.
अनुसूचित जाती-जमाती, इतर मागास वर्ग, विमुक्त भटक्या जमाती, महिला राखीव आणि सर्वसाधारण अशा विविध प्रवर्गातून एकूण 32 जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले होते. तिघांनी मागे घेतल्याने आता 31 उमेदवार शिल्लक राहिले आहेत.
