राजू जैनवार
असरअल्ली : येथील सामाजिक कार्यकर्ते राजू जैनवार यांचे छत्तीसगड राज्यातील मद्देड-भोपालपट्टनम जवळ झालेल्या अपघातात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 47 होते. काल असरअल्ली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू जैनवार हे कामानिमित्त छत्तीसगड राज्यातील मद्देड येथे गेले असता ट्रकला ओव्हरटेक करीत असताना अतिशय वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
काल दिनांक 5 मार्च 2025 ला असरअल्ली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस मोठ्या संख्येने असरली येथील नागरिक उपस्थित होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले असा मोठा आप्तपरिवार आहे.

