अहेरी : परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. विशिष्ट कालावधीनंतर बदल होणे अपेक्षित असते. किंवा तो आपोआपच होतो. पतसंस्थेचेही असेच आहे. संचालक मंडळात बदल व्हायला पाहिजे. सोसायटी बचाव पॅनलला पाच वर्षासहित चार वर्ष अतिरिक्त मिळाले. म्हणून बदल अपेक्षित आहे. मतदारांचा कल समता पॅनलच्या बाजूने असेल असे वाटते. असे मत जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या मतदार व समूह निवासी शाळा एटापलीच्या शिक्षिका सीता टेकुलवार यांनी मांडले.
प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्या म्हणाल्या की नऊ वर्षानंतर पतसंस्थेची निवडणूक होऊ घातली आहे. तांत्रिक अडचणीमुळे कार्यकाळ वाढ वाढला. कार्यकाळ पाच वर्षासाठीच होता चार वर्ष अतिरिक्त मिळाले. पुन्हा या पॅनलला पाच वर्ष कशासाठी. या पॅनल ने विश्राम करायला पाहिजे होता. पण लोकशाही आहे. निवडणुकीत कोणालाही उभा राहता येते. सोसायटी बचाव पॅनल पुन्हा निवडणूकच्या मैदानात असले तरी मतदारांचा कल मात्र समता पॅनल कडून असेल असे वाटते.
समता पॅनल ने नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. या पॅनल मध्ये नऊ उमेदवार नवीन आहेत. शैक्षणिक कार्यात सामाजिक जाणीवेचा समावेश करून वाहून घेतलेले दिवाकर मादेशी, श्रीकांत काटेलवार सारखे शिक्षक या पॅनलमध्ये आहे. समन्वय चांगला साधला आहे. म्हणून या पॅनल कडे मतदारांचा कल असेल.
