राजू आत्राम या नावाने जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात ओळख. 2017 ला संपन्न झालेल्या व पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक संचालक म्हणून निवड. लक्ष्मण गद्देवार गटाकडून अध्यक्ष पदासाठी राजू आत्राम यांचे नाव पुढे आले आणि पाच वर्षासाठी अध्यक्ष पद मिळाले. निसर्गाने त्यांचे अध्यक्षपद पाच वर्षावरून आठ वर्षांवर पोहोचवले . आठ वर्ष अध्यक्षपद सांभाळण्याचा बहुमान राजू आत्राम यांना मिळाला. या पार्श्वभूमीवर मावळते अध्यक्ष म्हणून राजू आत्राम यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न – पाच वर्षांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय सांगा.
उत्तर – 2017 ला प्रभार सांभाळला कर्ज पुरवठा करीत असताना कर्जाचा व्याजदर 14 टक्के होता. हा व्याजदर खूप जास्त असल्याचे लक्षात आले. शिक्षकी पेशात पाय ठेवल्यानंतर शिक्षकाला प्रत्येक कार्य कर्ज काढूनच करावे लागते. शिक्षकावर कमीत कमी व्याज लागावे म्हणून प्रचलित 14 टक्क्याचा व्याजदर 10 टक्क्यावर आणण्यात आला. घेण्यात आलेल्या निर्णयाने शिक्षकाचे मोठी बचत झाली. कमीत कमी व्याज दराने शिक्षकांना कर्ज दिल्याचे समाधान आहे.
प्रश्न – शिक्षक हिताची एखादी योजना सांगा.
उत्तर – जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आहेरी ही प्रामुख्याने तीन तालुक्यासाठी काम करते. यात अहेरी, भामरागड, एटापल्ली तालुक्याचा समावेश आहे. या तीनही तालुक्याचा 70 ते 80 टक्के भाग दुर्गम, अतिदुर्गम आहे. शाळेवर जाताना येताना प्रचंड त्रास भोगावा लागतो. जोखीम पत्करावी लागते या जोखीमेत पतसंस्थेचा हातभार लागावा म्हणून समूह अपघात विमा योजना सुरू केली आहे, सभासदासाठी वीस लाख रुपयाची ही अपघात विमा योजना आहे.
प्रश्न – यावेळेस निवडणूक राहण्याचे कारण.
उत्तर – 28 फेब्रुवारी 2026 ला सेवानिवृत्त होत आहे. फक्त एक वर्षाचा सेवाकाळ शिल्लक राहिला आहे. निवडणुकीला उभे राहता आले असते पण एका वर्षातच पुन्हा राजीनामा द्यावा लागला असता. नव्याने पुन्हा निवडणुका झाल्या असत्या. यापेक्षा न राहिलेलेच बरे. समविचारी शिक्षकांसोबत आहे.
प्रश्न – केलेल्या कामावर समाधानी आहात का.
उत्तर – पाच वर्षाचा काळ अनपेक्षित पणे आठ वर्षे झाला. आठ वर्षाच्या कार्यकाळात प्रत्येक काम नियमाने केले. शिक्षकी पेशा सांभाळून बराच वेळ पतसंस्थेसाठी दिला. सभासदांच्या प्रत्येक समस्या तत्परतेने सोडविल्या. मिळालेल्या कार्यकाळाबाबत पूर्णपणे समाधानी आहे.
प्रश्न – या निवडणुकीत आपली भूमिका काय असेल.
उत्तर – 2017 च्या निवडणुकीत आमच्या पॅनलचे 11 पैकी सहा सदस्य विजयी झाले. आता 13 सदस्य संचालक मंडळ आहे. निवडणुकीत उभा नसलो तरी सोसायटी बचाव पॅनल चे सदस्य निवडून यावे म्हणून पूर्ण ताकतीनिशी काम करणार आहे. जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याचा मानस आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मावळत्या अध्यक्ष राजू आत्राम यांनी प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिलखुलास पद्धतीने दिली. मिळालेल्या आठ वर्षाच्या कार्यकाळावर ते समाधानी आहेत. तीन वर्षाचा बोनस कार्यकाळ त्यांना मिळाला. त्याला ते ईश्वरी कृपा समजतात.

